Advertisement

रिओ पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार


रिओ पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार
SHARES

रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये उंच उडी प्रकारातील सुवर्णपदक विजेता मारियप्पन थंगावेलला आणि भाळफेकीत दोनदा सुवर्णपदक पटकावलेल्या देवेंद्र झाझरीया यांचा महाराष्ट्र सरकारने १ कोटींचे बक्षीस देऊन सत्कार केला. हा सत्कार समारंभ सह्याद्री अतिथी गृह येथे झाला. यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडे तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आणि एमसीए अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

या कार्यक्रमात रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक तसेच राज्यातील एकूण २३ खेळाडूंचाही रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.


रिओ ऑलिम्पिक पदक विजेते

  • कुस्तीपटू साक्षी मलिक (५० लाख), हरियाणा, मार्गदर्शक कुलदिप सिंग(२५ लाख)
  • ॲथलेटिक्स ललिता बाबर (७५ लाख), मार्गदर्शक भास्कर भोसले (२५ जाख)
  • रोईंगपटू दत्तू भोकनळ (५० लाख)
  • हॉकीपट्टू देविंदर सुनिल वाल्मिकी (५० लाख)
  • मॅरेथॉनपटू कविता राऊत (५० लाख)
  • नेमबाजीपटू आयोनिका पॉल (५० लाख)
  • लॉन टेनिसपट्टू प्रार्थना ठोंबरे (५० लाख)


रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू

  • उंच उडी - मरिय्यप्पन थंगावेलू (१ कोटी), मार्गदर्शक सत्यनारायण (२५ लाख)
  • भालाफेक - देवेंद्र झाझरिया (१ कोटी), राजस्थान, मार्गदर्शक सुनिल तंवर (२५ लाख)
  • गोळाफेक - दिपा मलीक (७५ लाख), हरियाणा, मार्गदर्शक वैभव सरोही (१८.७५ लाख)
  • उंचउडी - वरुन भाटी (५० लाख), नोयडा, मार्गदर्शक सत्यनारायणा (१२.५० लाख)
  • जलतरण - सुयश जाधव (५० लाख)


महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी राज्यातील खेळाडू

  • मोना मेश्राम (५० लाख)
  • पुनम राऊत (५० लाख)
  • स्मृती मानधना (५० लाख)
  • संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य (१० लाख)
  • फिजोओ थेरेपिस्ट रश्मी पवार (१० लाख)

तसेच बेलजीम २०१७ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी घेतलेला सायकलपटू ओमकार जाधव याला आंतरराष्ट्रीय सायकल खरेदीकरिता आर्थिक सहाय्य म्हणून (६ लाख) देऊन सन्मान करण्यात आला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा