Advertisement

जिंदाल स्क्वाॅश अकादमीने जिंकले मुंबई अांतरक्लब लीगचे जेतेपद


जिंदाल स्क्वाॅश अकादमीने जिंकले मुंबई अांतरक्लब लीगचे जेतेपद
SHARES

जेतेपदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या जिंदाल स्क्वाॅश अकादमीने अचूक रणनीती अाखत अाणि योग्य खेळाडूंची निवड करत जुहू विलेपार्ले जिमखाना क्लबवर (जेव्हीपीजी) ३-२ असा थरारक विजय मिळवत हयात रिजन्सी मुंबई अांतरक्लब स्क्वाॅश लीगचे जेतेपद पटकावले. भारतीय स्क्वाॅश प्रोफेशनल्सतर्फे अायोजित करण्यात अालेल्या अाणि हयात रिजन्सी कोर्टवर रंगलेल्या या स्पर्धेत जिंदाल संघ १-२ असा पिछाडीवर पडला होता. त्यानंतर एकेरीचे दोन्ही सामने अाणि दुहेरीचा सामना जिंकत जिंदाल अकादमीने जेतेपदावर नाव कोरले.


अभिषेकने दिली सुरेख सुरुवात

अभिषेक अगरवालने पहिल्या सामन्यात अाराश मेहता याला ११-८, ११-४ असे सहज हरवत जिंदाल अकादमीला सुरेख सुरुवात करून दिली. मात्र नंतर जिंदाल अकादमीला दुहेरीच्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले. दीपक मंडल-राजीव गुप्ता या जोडीला भावेश शाह-उर्वशी जोशी या जोडीकडून ११-५, २-११, ६-११ असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर एेश्वर्य सिंग-शशी पांडे यांनी अभिषेक अगरवाल-पुनीत प्रतिक यांचे अाव्हान ६-११, ११-६, ११-१० असे मोडून काढत जेव्हीपीजाीला २-१ असे अाघाडीवर अाणले.


जिंदाल अकादमीचे कमबॅक

अविनाश यादवने चौथ्या सामन्यात अम्रितपाल कोहली याचा ११-५, ११-७ असा धुव्वा उडवत जिंदाल अकादमीला कमबॅक करून दिलं. पाचव्या अाणि अंतिम सामन्यात प्रदीप चौधरी अाणि संदीप पासवान या जिंदाल अकादमीच्या दुहेरीच्या जोडीनं कडवी लढत देत अम्रितपाल कोहली अाणि अाशिष मेहता यांचा ७-११, ११-१०, ११-७ असा पराभव करून जेतेपद पटकावलं.


हेही वाचा -

विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज – क्विंटन डी काॅक

अजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा