मांडवी क्रिकेट स्पर्धेत जे.जे.11 ची बाजी

 Masjid
मांडवी क्रिकेट स्पर्धेत जे.जे.11 ची बाजी
मांडवी क्रिकेट स्पर्धेत जे.जे.11 ची बाजी
See all
Masjid, Mumbai  -  

मस्जिद बंदर - प्रभाग क्रमांक 223 मध्ये भाजपाच्यावतीनं माजी पंतप्रधान अटलबिहारी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे दक्षिण मुंबई युवा अध्यक्ष नितीन गवांदे यांच्याहस्ते या सामान्यांचे उद् घाटन झाले. या स्पर्धेत जे.जे.11 या संघाने बाजी मारली असून, शितला देवी 11 संघाला पराभव पत्करावा लागला. सर्वोत्कृष्ठ गोलंदाज म्हणून विपूल जाधव याला गौरविण्यात आलं असून, फलंदाज म्हणून अजय चाफेकर याला गौरविण्यात आले. यावेळी दोन्ही संघांना मेडल देऊन गौरविण्यात आले. जवळपास 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या आयोजनामागे रोहन चाळके, सुनील खैर, चिराग दोषी यांचाही सहभाग होता.

Loading Comments