मुलुंड- रविवारी व्ही पि एम महाविद्यालयाच्या मैदानात 'मुलुंड फ्रेंड्स रजिस्टर' तर्फे सुरेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. या कबड्डी सामन्यांमध्ये महाराष्ट्रातून अनेक संघ सहभागी झाले होते. या सामन्यांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कबड्डी पटू निलेश शिंदे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या सामन्यांमधून मीरा भाईंदर या संघाला प्रथम क्रमांकाने तर आशिर्वाद महापे या संघाला द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले. या सामन्यासाठी कबड्डी प्रेमींचीही बरीच गर्दी जमली होती. पहिल्या फेरीत 16-22 या गुणसंख्येमध्ये मीरा भाईंदर संघ 6 अंकांनी पुढे होता. परंतु दुसऱ्या फेरीत सुरुवातीला बाजी पलटत आशिर्वाद महापे या संघाने मीरा भाईंदर संघाचे सर्व खेळाडू बाद करून 3 अंकांनी पुढे जाऊन 25-22 हा स्कोर केला. त्यानंतर मीरा भाईंदर संघाने 1-1 गुण मिळवत 11 अंकांच्या फरकाने 26 -37 असा दणदणीत विजय मिळवला.