गुरू शिष्याची कमाल

  Andheri west
  गुरू शिष्याची कमाल
  मुंबई  -  

  जोगेश्वरी- धीरज पवार संचालित गोजू रिऊ निडूकाय कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या वर्षात आपले कराटे कौशल्य दाखवले. धीरज पवार हे गेली अनेक वर्षे कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पवार यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके प्राप्त करुन दमदार कामगिरीची नोंद केली आहेच. पण आता त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील राज्यस्तरीय कराटेमध्ये यश संपादन केले आहे. गोजू रिऊ निडूकाय क्लासेस मार्फत महिलांना गेले १० वर्ष स्वसंरक्षणचे मोफत प्रशिक्षण देखील दिले जात आहे.

  जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं 11 स्प्टेंबर 2016 भरलेल्या राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत यश मिळवलं आहे. गोजू रिऊ निडूकाय क्लासेसच्या कराटे चॅम्पियन्सनी तब्बल 15 सुवर्णपदके, 13 रौप्यपदके आणि 10 कांस्यपदक मिळवत दमदार कामगिरी केली. काथा आणि कुमिते या दोन्हीही गटांमध्ये कराटे चॅम्पियन्सनी लक्षणीय कामगिरी केली. राज्यस्तरीय स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे पवार यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ निश्चितच त्यांच्या विद्यार्थ्यांना झाल्याचे दिसून आले आहे.

  गोजू रिऊ निडूकाय क्लासेसमधून पोलिस दल आणि त्यांच्या मुलांना मोफत प्रशिक्षणही दिले जाते. गोजू रिऊ निडूकाय क्लासेसने आशियाई तसेच ऑलिम्पिक स्पर्धांच्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.