SHARE

मुंबई - कर्नाटक स्पोर्टींग असोसिएशनने वरळी स्पोर्टस् क्लबला 159 धावांनी हरवत तालीम शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. नाणेफेक जिंकून कर्नाटक स्पोर्टस् क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 44 षटकांत 299 धावा केल्या. यामध्ये कौस्तूभ पवार, विद्याधर कामत आणि रोहन केरकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. दरम्यान 299 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वरळी जिमखाना संघ 140 धावांत गारद झाला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या