• पालिका शाळांच्या खो-खो स्पर्धा
  • पालिका शाळांच्या खो-खो स्पर्धा
  • पालिका शाळांच्या खो-खो स्पर्धा
  • पालिका शाळांच्या खो-खो स्पर्धा
SHARE

घाटकोपर – एन वॉर्डच्या महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं खो-खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा पंतनगर मराठी शाळा क्र. 3 च्या मैदानात घेण्यात आली. या स्पर्धेत 24 पालिका शाळेच्या इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे 288 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत रमाबाई मराठी शाळा क्र. 1 या शाळेच्या विद्यार्थीनींनी आणि पंतनगर इंग्रजी शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. या दोन्ही विजयी शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणत्र आणि चषक देण्यात आलं. शिक्षण विभागाचे कनिष्ट पर्यवेक्षक सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या