SHARE

मुंबई - मुंबईच्या प्रत्येक गल्लीत क्रिकेट हा खेळ खेळला जातो. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दूसऱ्या भास्कर ठाकूर मेमोरिअल अंडर 12 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या टूर्नामेंटमध्ये प्रत्येक मॅच 25 षटकांची खेळवली जाणार आहे. 17 ते 27 जानेवारीदरम्यान या टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच तामिळ शिल्ड क्रिकेट टुर्नामेंट 2017चं देखील आयोजन करण्यात आलं आहे. हा ए आणि बी लेवलचा नॉक आऊट क्रिकेट राऊंड आहे. ही मॅच 45 षटकांची असेल. ठाणे वैभवच्या वतीने वैभव इंटर कॉर्पोरेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. या टुर्नामेंटमध्ये 29 कॉर्पोरेट संघ सहभाग घेतील. ही टुर्नामेंट 31 मार्चपर्यंत असणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या