Advertisement

करमन, झीलचा मुंबई ओपनमध्ये पराभव


करमन, झीलचा मुंबई ओपनमध्ये पराभव
SHARES

एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेत युवा भारतीय खेळाडू करमन कौर थंडी आणि झील देसाई यांनी वाईल्ड कार्डच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी केली. पण, नंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ही स्पर्धा चर्चगेट येथील सीसीआय टेनिस कोर्ट्सवर खेळवण्यात आली.


भारताच्या करमनला स्लोव्हेनियाचा पराभव

भारताच्या दुसऱ्या मानांकित 19 वर्षीय करमन स्लोव्हेनियाचा 26 वर्षीय बिनमानांकित डालिला जाकुपोविक हीनं 2-6, 4-6 अशा फरकानं पराभव केला. याआधी झालेल्या डब्ल्यूटीएमध्ये 709 क्रमवारीत असलेल्या 18 वर्षीय झीलचा जागतिक क्रमवारीत 150 व्या स्थानी असलेल्या 22 वर्षीय झा ओकला हीनं 6-3, 6-1 अशा फरकानं पराभव केला.


माझ्यासाठी ही चांगली संधी होती - करमन

सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत करमनला स्लोव्हेनिया हीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली 'या गेममध्ये संधी होती. पण, सामन्यामध्ये सर्व्हिस म्हणावी तशी होत नव्हती. दुसऱ्या सेटमध्ये चांगली कामगिरी केली. सामना 4-4 असा बरोबरीत असताना मी 30-0 अशी आघाडीवर होती. डालिला ही माझ्यापेक्षा चांगली खेळत होती. मी काही चुकीचे फटके देखील खेळले. तरी घरच्या कोर्टवर खेळल्याने हा अनुभव चांगला होता. माझ्यासाठी ही चांगली संधी होती आणि माझे लक्ष उद्यापासून सुरू होणाऱ्या दुहेरीच्या सामन्यांकडे आहे'.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा