महिंद्रा अँड महिंद्रा अजिंक्य


  • महिंद्रा अँड महिंद्रा अजिंक्य
  • महिंद्रा अँड महिंद्रा अजिंक्य
  • महिंद्रा अँड महिंद्रा अजिंक्य
SHARE

लोअर परळ - यंग विजय क्रीडा मंडळ आयोजित आणि सार्थ प्रतिष्ठान पुरस्कृत राज्यस्तरीय व्यसायिक कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी रंगाला होता. यामध्य महिंद्रा अँड महिंद्रा संघानं मुंबई पोलीस संघावर मात करून दणदणीत विजय मिळवला. यासह रोख रक्कम एक लाख आणि हिंदूहृदय सम्राट चषकावर आपलं नाव कोरलंय. तर उपविजयी ठरलेल्या मुंबई पोलीस संघाला रोख रक्कम 75 हजार आणि चषकावर समाधान मानावं लागलं. सामनावीर म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा संघाच्या मनीष भायदे आणि उत्कृष्ट पकड म्हणून अतुल सावंत या खेळाडूंना रोख रक्कम 15 हजार आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. तर मुंबई पोलीस संघाचा विफुल मोकळे याला उत्कृष्ट चढाई म्हणून रोख रक्कम 15 हजार आणि चषक देऊन सन्मान करण्यात आला.

राज्यस्तरीय व्यसायिक कबड्डी स्पर्धेत उपउपांत्य विजयी सेन्ट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे या दोन्ही संघास रोख रक्कम 20 हजार आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या अंतिम सामन्याला शिवसेनेचे खाजदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई, स्थानिक आमदार सुनील शिंदे, नगरसेविका किशोरी पेडणेकर हे दिग्गज नेते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या