Advertisement

वायएमसीएची नागपाडावर ७७-७६ने मात

वायएमसीए बास्केटबॉल टुर्नामेंट स्पर्धेत मस्ताना वायएमसीए संघाने अटीतटीच्या लढतीत नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनवर ७७-७६ अशी मात करत अटीतटीच्या लढतीत पुरुषांच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.

वायएमसीएची नागपाडावर ७७-७६ने मात
SHARES

वायएमसीए बास्केटबॉल टुर्नामेंट स्पर्धेत मस्ताना वायएमसीए संघाने अटीतटीच्या लढतीत नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनवर ७७-७६ अशी मात करत अटीतटीच्या लढतीत पुरुषांच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. ही स्पर्धा बॉम्बे वायएमसीए शारिरीक शिक्षण विभागातर्फे आग्रीपाडा येथे आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान, मुलांच्या अंतिम फेरीत नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनने ६९-६७ अशा फरकाने सेवियो क्लबवर मात करत विजय आपल्या खिशात घेतला. यावेळी नागपाडाच्या पुरूष गटाला रोमांचक लढतीत मस्तान वायएमसीए संघाकडून पराभव पत्करावा लागला. तर ज्युनिअर मुलांच्या गटात पुन्हा एकदा नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनला मस्तान वायएमसीएकडून पराभवाची झळ लागली. यामध्ये मस्तान संघाने ६६-५१ अशा फरकाने नागपाड्याचा पराभव केला. यानंतर नागपाड्याने पुन्हा मिनी बॉईज गटात ५२-३२ अशा मोठ्या फरकाने वेलिंगडन वायएमसीए संघाला झोपवत बाजी मारली.



महिला गटांच्या अंतिम फेरीत वांद्रे वायएमसीएने डोमिनिक सेवियोला ३७-२० अशा गुण संख्येने पराभूत करत अंतिम फेरीत विजय मिळवला. डोमिनिकच्या अंशिका कनोजिया हिने एकटीने १९ गुणांची कमाई करत संघाला विजयी करण्याचे प्रयत्न केले. पण वांद्रेच्या खेळाडूंपूढे तिला फार काळ टिकता आले नाही.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा