Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मि. इंडिया बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनानं निधन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील कलाकार, खेळाडू, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक, कामगार, पोलिस, डॉक्टर यांसारख्या अनेकांनी आपला जीव गमवला आहे.

मि. इंडिया बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनानं निधन
SHARES

राज्यात कोरोनानं हातपाय पुन्हा पसरले असून, या कोरोनानं लहान मुलांसापासून अगदी मोठ्यांनाही सोडलेलं माही. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील कलाकार, खेळाडू, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक, कामगार, पोलिस, डॉक्टर यांसारख्या अनेकांनी आपला जीव गमवला आहे. अशातच आता धक्कादायक बाब म्हणजे कोरोनामुळं तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड (Jagdish Lad) याचाही कोरोनानं बळी घेतला आहे. जगदीश लाड केवळ ३४ वर्षांचा होता. 

बॉडी बिल्डिंगमधील मानाचा मि. इंडिया हा किताब पटकावणारा जगदीश लाड केवळ ३४ वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्यानं लाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जगदीशला काही दिवसापूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा इथं उपचार सुरु होते. तिथंच त्यानं अखेरचा श्वास घेतला. जगदशीसारख्या धष्टपुष्ट तरुणाला कोरोना हतबल करत असेल, तर जे कोणी कोरोनाला सिरियस घेत नसेल, त्यांनी आता पुन्हा एकदा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.

जगदीश लाड हा नवी मुंबईत राहात होता. त्यानं मागील वर्षीच गुजरातमधील बडोदा इथं जीम सुरु केली होती. त्यामुळं तो तिकडंच वस्तीला असायचा. जगदीशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचं आकर्षण होतं. त्यामुळं पिळदार शरीरयष्टीच्या जगदीशनं महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यानं नवी मुंबई महापौर श्रीसह मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती.

मिस्टर इंडिया किताब

जगदीशच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे त्याने मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदकं पटकावली होती. इतकंच नाही तर मुंबईतील वर्ल्ड चॅम्पियन्सशिपमध्ये त्याला कांस्य पदक मिळालं होतं. जगदीश लाडच्या निधनानं बॉडीबिल्डिंग विश्वावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा