टेबल टेनिस स्पर्धेत मुलुंड जिमखान्याच्या मुलींची बाजी

 Juhu
टेबल टेनिस स्पर्धेत मुलुंड जिमखान्याच्या मुलींची बाजी
Juhu, Mumbai  -  

विलेपार्ले येथील एमएसडीटीटीएच्या जूहू-विलेपार्ले जिमखान्यावर झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत मुलुंड जिमखान्याच्या मुलींनी बाजी मारली. गतविजेत्या मुलुंड जिमखान्यासह राज्यातील रॅंकिग खेळाडू चार्व्ही कावळे, प्रीती भोसले, शाल्मली गोसार आणि मृण्मयी म्हात्रे यांच्यासह राज्यातील खेळाडूंनी आपले प्रतिस्पर्ध्यांना चांगली लढत देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. संपूर्ण खेळात त्यांनी एकही टाय गमावला नाही, असं त्यांचं वर्चस्व होतं. तसेच महिला विभागात मुलुंड जिमखाना विरुद्ध जेएलटीटीए, अंधेरी वायएमसीए आणि न्यू कम्युनिटी सेंटरमध्ये झालेल्या सामन्यात प्रत्येकी 3-0 असे गुण मिळवत मुलुंड जिमखान्याने विजय मिळवला.

पुरुष विभागात झालेल्या उपांत्य सामन्यात कांदिवली रिक्रिएशन विरूद्ध कमला विहारमध्ये 3-1 ने कांदिवली संघाला पराभव पत्करावा लागला. तसेच दुसऱ्या सामन्यात सुप्रीमो टीटीए विरुद्ध जयेश लखानी टीटीएमध्ये 3-2 अशा फरकाने सुप्रिमो टीटीएने विजय मिळवण्यात यश मिळवलं. अंतिम सामना रविवारी होणार आहे.

Loading Comments