हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबईचा दणदणीत विजय

 Mumbai
हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबईचा दणदणीत विजय

मुंबई - हॉकी इंडिया लीग (एचआइएल) मध्ये दबंग मुंबईने शुक्रवारी गतविजेत्या पंजाबवर 10-4 असा विजय मिळवला. कर्णधार फ्लोरियन फुच आणि अफ्फान युसूफ यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तीन सामन्यानंतर मुंबई 12 गुणांनी अव्वल स्थानावर आहे. या सामन्याच्या पाचव्या मिनिटाला निक्किम थिमैयाने मैदानी गोल करत मुंबईला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर पंजाबने देखील पलटवार करत मुंबईला मात दिली. पण अखेरच्या तीन मिनिटात दमदार कामगीरीमुळे पंजाबवर मात करण्यात मुंबईला यश आलं.

Loading Comments