मुंबई सीसी पुन्हा उपविजेता


SHARE

पाचव्या फोर नेशन अहमद सरजी क्रिकेट कप लीगमध्ये मुंबई सीसी संघाने मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही उपविजेतेपद पटकावले आहे. हा सामना बुधवारी बांग्लादेशच्या कलाबगन संघासोबत मलेशियाच्या क्वालालंपूर येथे खेळवण्यात आला.

अतिंम सामन्यात झालेल्या रोमांचक लढतीत मुंबई सीसीच्या खेळाडूंनी उत्तम असा प्रदर्शन केले. कलाबगन संघाने देखील ९८ धावांचा लक्ष्य गाठत विजय आपल्या खिशात घातला. मुंबई सीसीच्या फलंदाजांना ९७ च्या पुढे धावा करता आल्या नाहीत. कलाबगनच्या सय्यद मोकम्मल अली याने १५ धावांत ६ बळी घेतले तर रतन दास याने १८ धावांत दोन बळी घेतले.

मुंबई सीसीच्या गोलंदाजांनीदेखील कलाबगनच्या फलंदाजांना घाम फोडला. मुंबई सीसीच्या शशी कदम याने १३ धावांत ४ बळी घतले, तर वेदांत पाटील याने १४ धावांत दोन बळी घेतले. तर पराग खानापूरकर याने २७ धावा देत २ बळी घेतले. पण बांग्लादेशच्या फलंदाजानी ९७ धावांच्या डोंगर पार करत विजय मिळवला.


हेही वाचा - 

मलेशियात मुंबई सीसी संघाचा विजय


संबंधित विषय