मुंबई सुपर लीग टेबल टेनिसचा थरार 8 जूनपासून

 Worli
मुंबई सुपर लीग टेबल टेनिसचा थरार 8 जूनपासून
Worli, Mumbai  -  

गट 'ब' मुंबई सुपर लीग टेबल टेनिस चॅम्पियनशीप या स्पर्धेचे आयोजन वरळीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. यामध्ये तरुणांपासून ते जेष्ठ खेळाडूंचा समावेश असणार आहे. 4 दिवस ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या चॅम्पियनशीपमध्ये विजेत्याला 1 लाख 80 हजार रुपयांचे, उपविजेत्यास 1 लाख 20 हजार रुपयांचे पारितोषिक तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकास अनुक्रमे 70 हजार आणि 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेत एकूण 10 संघांचा समावेश आहे.प्रत्येक संघात 6 खेळाडू असणार आहेत. प्रत्येक संघातील सहा खेळाडूंमध्ये (पुरुष, महिला, ज्युनियर बॉय, ज्युनियर गर्ल, कॅडेट बॉय आणि वेतरन) अशा विविध वयोगटातील खेळाडूंचा समावेश असेल. दहा संघ हे दोन गटात विभागले आहेत. प्रत्येक गटात 5 संघ असतील. तसेच या परिषदेत एनएससीआयचे चेअरमन मोनीष भन्साली, कमलेश मेहता डायरेक्टर, इलेव्हन स्पोर्टस, महेंद्र चिपळूनकर, जॉइंट सेक्रेटरी, एमसीडीटीटीए, जीगर रामभीया, एमएसएल लीगचे चेअरमन तसेच प्रत्येक संघाचे मालक आणि आदी मंडळी उपस्थित होते. या स्पर्धेत निशाद शाह सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. त्याला 38 हजाराला विकत घेतले आहे. महिला गटात दिव्या महाजन या खेळाडूला 26 हजार 350, सेनोरा डिसोजाला 21 हजार 750, ज्युनीयर बॉय गटात रीगन अल्बूर्क्यूक्यूला 18 हजार 750, ज्युनियर गर्ल गटात श्रृष्टी हलेनगदी हिला 22 हजार 500, कॅडेट गटात हवीश असरानीला 14 हजारांत आणि वेतरन गटात किरण सालीयनला 13 हजार 850 रूपयांत विकत घेतले आहे. इलेव्हन स्पोर्टस् आयोजित मुंबई सुपर लीग टेबल टेनीस चॅम्पियनशीप ही वरळीच्या एनएससीआय क्लब येथे 8 जून ते 11 जून 2017 पर्यंत सकाळी 9.30 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8.30 या वेळेत होणार आहे.

मुंबई सुपर लीगमधील संघ खालील प्रमाणे


गट 'अ'
गट 'ब'
1
एसीई
हाय टाईट
2
किंग पाँग
कूल स्मॅशर्स
3
सुपर फायटर
ब्लेझिंग ब्लॅशर्स
4
दी टॉपस्पिनर्स
फॅन्टॉन स्टार्स
5
एमटीसी रॉयल्स
सेन्च्युरी वॉरिअर्सLoading Comments