मुंबईत रंगणार NBA च्या बास्केटबाॅल मॅच

इंडियाना पेसर्स आणि सॅक्रामेंटो किंग्ज या दोन टीम २०१९ च्या नव्या सीझनमध्ये २ सामने मुंबईत खेळाणार आहेत, अशी घोषणा 'एनबीए'तर्फे करण्यात आली आहे. या दोन्ही मॅच अनुक्रमे ४ आणि ५ आॅक्टोबर रोजी होणार आहेत. या मॅच वरळीतील एनएससीआय डोम स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील.

SHARE

'नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन' अर्थात 'एनबीए'ची अमेरिकेसह संपूर्ण जगात वेगळी ओळख आहे. मायकल जाॅर्डन, लेब्रन जेन्स, बील रसेलच्या मॅच बास्केटबाॅलवेड्या असंख्य भारतीयांनी रात्रभर जागून पाहिल्या असतील. या मॅच पाहताना भारतात इतक्या उच्च दर्जाच्या मॅच केव्हा बघायला मिळतील, असा प्रश्नही चाहत्यांना नक्कीच पडला असेल. पण ही प्रतीक्षा आता संपली आहे. कारण 'एनबीए' चक्क मुंबईत २ बास्केटबाॅल मॅचचं आयोजन करत आहे.

कधी होणार मॅच?

इंडियाना पेसर्स आणि सॅक्रामेंटो किंग्ज या दोन टीम २०१९ च्या नव्या सीझनमध्ये २ सामने मुंबईत खेळाणार आहेत, अशी घोषणा 'एनबीए'तर्फे करण्यात आली आहे. या दोन्ही मॅच अनुक्रमे ४ आणि ५ आॅक्टोबर रोजी होणार आहेत. या मॅच वरळीतील एनएससीआय डोम स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील.

कुणाचा समावेश?

सॅक्रामेंटो संघाचे भारतीय वंशाचे मालक विवेक रणदिवे यांच्या संघात मार्विन बाग्ले,
डी. अॅरोन फाॅक्स, बडी हिल्ड सारखे खेळाडू आहेत. तर द पेसर्स या संघात एनबीएचे स्टार खेळाडू व्हिक्टर आॅलाडिपो, माइल्स टर्नर आणि डोमान्टास सबोनिस यांचा समावेश आहे.

आॅनलाईन तिकीटे

या मॅचची तिकीटे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. तसंच, भारतात या मॅचचं थेट प्रक्षेपण दाखवलं जाणार असून इतर देशांमध्ये या मॅच टी.व्ही., सोशल मीडियावर दाखवण्यात येणार आहेत.हेही वाचा-

मुंबई इंडियन्स संघात मलिंगाचं कमबॅक, युवराजलाही मिळाला चान्स

धवल कुलकर्णीचं मुंबई संघात कमबॅकसंबंधित विषय
ताज्या बातम्या