Advertisement

मुंबईत रंगणार राष्ट्रीय अंध बुद्धिबळ स्पर्धा


मुंबईत रंगणार राष्ट्रीय अंध बुद्धिबळ स्पर्धा
SHARES

देशातील अंध बुद्धिपळपटूंसाठी सर्वोच्च समजली जाणारी राष्ट्रीय अ अंध बुद्धिबळ स्पर्धेचा थरार यंदा मुंबईत रंगणार अाहे. अखिल भारतीय चेस फेडरेशन फाॅर द ब्लाइंड (एअायसीएफबी) या संघटनेच्या मान्यतेने अंधेरी स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स इथं ३ ते ११ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा रंगणार अाहे.


विजेता सर्वोत्तम अंध बुद्धिबळपटू ठरणार

राष्ट्रीय ब बुद्धिबळ स्पर्धेतून कामगिरीच्या निकषावर १४ खेळाडूंची निवड मुंबईत रंगणाऱ्या स्पर्धेसाठी करण्यात अाली अाहे. राष्ट्रीय अ अंध बुद्धिबळ स्पर्धा ही देशातील सर्वोच्च बुद्धिबळ स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेतील विजेता हा देशातला या वर्षासाठीचा सर्वोत्तम अंध बुद्धिबळपटू ठरणार अाहे. बुद्धिबळ चॅम्पियन अाणि राष्ट्रीय विजेते डाॅ. चारुदत्त जाधव यांनी या स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेतले अाहेत.


जागतिक स्पर्धेसाठी निवडणार भारतीय संघ

या स्पर्धेतून जुलै २०१८ मध्ये रंगणाऱ्या अागामी जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडला जाणार अाहे. जागतिक स्पर्धा बल्गेरिया इथं रंगणार अाहे. त्याचबरोबर पोलंड इथं अाॅगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक ज्युनियर स्पर्धेसाठीही भारतीय खेळाडूंची निवड केली जाणार अाहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा