SHARE

उत्कर्ष स्पोर्टस अकादमी व कॅरम असोसिएशन अाॅफ पुणे यांच्या विद्यमाने चारुशील कुलकर्णी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या कॅरमपटूंचाच बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेवर मुंबईच्या खेळाडूंनी अक्षरश: वर्चस्व गाजविल्यामुळे महिला अाणि पुरुष गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्याच खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या नीलम घोडके हिने अनुभवी खेळाडू तसेच अव्वल मानांकित अाणि अायसीएफ चषक विजेती काजल कुमारी हिला १६-१२, २४-७ असे सहज पराभूत करत विजेतेपदाचा मान पटकावला.


गुफरानला विकासची टक्कर

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अनुभवी मोहम्मद गुफरान अाणि सध्या फाॅर्मात असलेला विकास धारिया हे मुंबईचेच दोन खेळाडू असल्यामुळे काँटे की टक्कर अपेक्षित होती. प्रेक्षकांनाही या दिग्गज खेळाडूंचा तोडीस तोड खेळ पाहायला मिळाला. विकासने पहिला सेट जिंकून अाश्वासक सुरुवात केली. मात्र गुफरानने पुढील दोन्ही सेट जिंकून हा सामना ९-२५, २५-५, २५-४ असा खिशात घातला.


उपांत्य फेरीत संजय मांडे पराभूत

उपांत्य फेरीत गुफरानने मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या संजय मांडे याला अटीतटीच्या लढतीमध्ये २५-१९, २०-२५, २२-११ असे हरविले होते. तर विकास धारियानेही साताऱ्याच्या जलाल मुल्ला याला उपांत्य सामन्यात तीन सेटनंतर १८-१९, २४-७, २५-० असे हरवून अंतिम फेरी गाठली होती. विजेत्यांना सिनेकलावंत चारुशीला कुलकर्णी यांच्या हस्ते १ लाख १० हजार रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात अाले.


हेही वाचा -

पाेर्तुगालचा पावलो मच्याडो मुंबई सिटी एफसीमध्ये सामील

रवी शास्त्रींच्या अायुष्यात अाली 'ही’ अभिनेत्री?संबंधित विषय
ताज्या बातम्या