Advertisement

पाेर्तुगालचा पावलो मच्याडो मुंबई सिटी एफसीमध्ये सामील


पाेर्तुगालचा पावलो मच्याडो मुंबई सिटी एफसीमध्ये सामील
SHARES

इंडियन सुपर लीगमधील (अायएसएल) मुंबई सिटी एफसी या संघात पोर्तुगालचा अांतरराष्ट्रीय फुटबाॅलपटू पावलो मच्याडो याला एका वर्षासाठी करारबद्ध करण्यात अाले अाहे. युरोपमधील बहुतेक प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर पावलो अाता मुंबई सिटी एफसी संघात सामील होत अाहे. अलीकडेच त्याने पोर्तुगालच्या सीडी अवेस या संघाला ता डे पोर्तुगाल चषक जिंकून दिला होता. मच्याडो याने १७ वर्षांखालील पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधित्व करताना अापल्या देशाला २००३ मध्ये यूएफा युरोपियन चॅम्पियनशिप जिंकून दिली होती. त्याचबरोबर तो पोर्तुगालच्या २० वर्षांखालील, २१ वर्षांखालील, २३ वर्षांखालील संघातूनही खेळला अाहे. पोर्तुगालच्या सिनियर संघाकडूनही तो सहा सामने खेळला अाहे.


मच्याडोच्या रूपाने एक सर्वात अनुभवी खेळाडू अाणि विजयाची मानसिकता असलेला भक्कम खेळाडू मुंबई सिटी एफसी संघात दाखल होणार अाहे. त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी उत्सुक अाहे. त्याच्या समावेशाने मुंबई संघ मोठी झेप घेऊ शकेल, अशी अाशा अाहे.
- जाॅर्ज कोस्टा, मुंबई सिटी एफसीचे मुख्य प्रशिक्षक


म्हणून मी अाॅफर स्वीकारली

जाॅर्ज कोस्टा अाणि मुंबई सिटी एफसीने मला या क्लबमध्ये सामील होण्याची संधी दिल्यामुळे मला पुन्हा विचार करावाच लागला नाही. पूर्वतयारीसाठी मी लवकरच थायलंडमध्ये सामील होणार अाहे. या संघातून खेळण्यासाठी मी खूप उत्सुक अाहे. अाता कठोर सराव करून संघाला यशोशिखरावर नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे मच्याडोने सांगितले. सध्या मुंबई सिटी एफसीचे खेळाडू थायलंडमध्ये प्रशिक्षणासाठी जाणार असून ते चार सामने खेळणार, अशी अपेक्षा अाहे. मुंबई सिटी संघात सामील होणारा मच्याडो हा पाचवा परदेशी खेळाडू ठरणार अाहे.


हेही वाचा -

युवा बुद्धिबळपटू सुहानीची केरळवासीयांना मदत

भारत-वेस्ट इंडिज चौथी वनडे २९ अाॅक्टोबरला मुंबईत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा