Advertisement

युवा बुद्धिबळपटू सुहानीची केरळवासीयांना मदत


युवा बुद्धिबळपटू सुहानीची केरळवासीयांना मदत
SHARES

'देणाऱ्याचे हात हजार… दुबळी माझी झोळी' असं म्हटलं जातं. एखाद्याला मदत करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. हेच चिमुरडी बुद्धिबळपटू सुहानी लोहिया हिनं दाखवून दिलं अाहे. वयाच्या नवव्या वर्षी मुंबईतील पहिली महिला कँडिडेट मास्टर होण्याचा मान पटकावणारी अाणि असंख्य ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धांचे जेतेपद पटकावणाऱ्या सुहानीनं अातापर्यंत जिंकलेली बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली अाहे. तिच्या या मदतीचा फायदा महापूराने अापले जीवन उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांना मिळणार अाहे. मनाचा मोठेपणा दाखविणाऱ्या या युवा बुद्धिबळपटूनं मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २३ हजार रुपयांची रक्कम सुपूर्द केली अाहे.


अाई-वडिलांना अानंद

धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये शिकणाऱ्या सुहानीनं गेल्या वर्षी सर्वात युवा मानांकित बुद्धिबळपटू असा नावलौकिक मिळवला होता. अापल्या मुलीनं मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान दिल्याचा अानंद तिची अाई शितल हिच्या चेहऱ्यावर अोसंडून वाहत होता. एका चांगल्या सामाजित उपक्रमासाठी सुहानीने मदत करून एक चांगला पायंडा पाडला अाहे. अनेक जण यामुळे प्रेरणा घेऊन गरजूंना मदत करतील, अशी अपेक्षा अाहे. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण अाहे. माझा मुलगा सिद्धांत यानेही अंध बुद्धिबळपटूंना प्राथमिक करण्याचा वसा घेतला अाहे, असे शितल लोहिया यांनी सांगितले.


सुहानीची कामगिरी

दक्षिण मुंबई चेस अकादमीमध्ये (एसएमसीए) बुद्धिबळाचे धडे गिरविणारी सुहानी ही अनेक वेळा राष्ट्रीय स्कूल चॅम्पियन ठरली अाहे. तिच्या अद्वितीय कामगिरीमुळे तिने अनेक अांतरराष्ट्रीय पदके अापल्या नावावर केली अाहेत. तिचा भाऊ सिद्धांत हासुद्धा ब्लिट्झ चॅम्पियन अाहे.


हेही वाचा -

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणारसंबंधित विषय
Advertisement