Advertisement

भारत-वेस्ट इंडिज चौथी वनडे २९ अाॅक्टोबरला मुंबईत


भारत-वेस्ट इंडिज चौथी वनडे २९ अाॅक्टोबरला मुंबईत
SHARES

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अाशिया कप स्पर्धेत अापला जलवा दाखवणार अाहे. अाशिया चषक स्पर्धेच्या पाच दिवसानंतरच भारतीय संघासमोर घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचे अाव्हान असणार अाहे. अाॅक्टोबर अाणि नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिज संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून दोन कसोटी, पाच वनडे अाणि तीन टी-२० सामने खेळणार अाहे. मुंबईतील चाहत्यांना वनडे मालिकेतील चौथा सामना पाहण्याची संधी मिळणार अाहे. वानखेडे स्टेडियमवर २९ अाॅक्टोबरला भारत, वेस्ट इंडिज संघांमध्ये हा सामना रंगेल.


कसोटी मालिकेने सुरुवात

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला कसोटी मालिकेपासून सुरुवात होणार अाहे. ४ ते ८ अाॅक्टोबरदरम्यान सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना होणार अाहे. तीन दिवसानंतर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार अाहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार अाहे.


पाच वनडेत विंडीजची कसोटी

दोन कसोटी सामन्यांत खेळल्यानंतर लगेचच पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार अाहे. पहिला सामना २१ अाॅक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बर्सापूरा स्टेडियममध्ये तर दुसरा अाणि तिसरा वनडे सामना इंदूर अाणि पुणे येथे रंगणार अाहे. चौथा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येईल. अंतिम वनडे थिरूवनंतपूरम येथे नव्याने बांधण्यात अालेल्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगेल. एेतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर पहिली टी-२० ४ नोव्हेंबरला तर दुसरा सामना कानपूर अथवा लखनौ येथे खेळविण्यात येईल. या दौऱ्याची सांगता ११ नोव्हेंबर रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर तिसऱ्या टी-२० सामन्याने होईल.


हेही वाचा -

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

मुंबई सिटी एफसी संघात बिपीन सिंगचा समावेश

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा