Advertisement

न्यूझिलंडमधल्या मुंबईकरानं रचला इतिहास, इंडियाचा पूर्ण संघ तंबूत

फिरकीपटू एजाज पटेलनं वानखेडे मैदानावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

न्यूझिलंडमधल्या मुंबईकरानं रचला इतिहास, इंडियाचा पूर्ण संघ तंबूत
SHARES

न्यूझीलंडचा ‘मुंबईकर’ फिरकीपटू एजाज पटेलनं वानखेडे मैदानावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाजनं एका डावात १० बळी घेतले. या विक्रमामुळे एजाजनं दिग्गज फिरकीपटू अनिस कुंबळेच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

एजाज पटेलनं ४७.५ षटकात १० विकेट्स पटकावल्या आहेत. यात त्यानं १२ षटकं निर्धाव टाकलीत. तर २.४९ च्या सरासरीनं ११९ धावा दिल्या आहेत.

एका डावात १० बळी घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. भारताच्या मोहम्मद सिराजच्या रूपात एजाजनं १०वा बळी घेतला आणि वानखेडे मैदानावर त्याच्या नावाचा जयघोष सुरू झाला.

१९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत इंग्लंडच्या जिम लेकर यांनी एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

टीम इंडियानं पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. मयांक आणि शुबमन गिल यांनी टीम इंडियाला ८० धावांची भागीदारी उभारून दिली. पण ३ फलंदाज झटपट माघारी परतले. गिल ७१ चेंडूंत ७ चौकार, १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झाला.

चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीला चूकीच्या निर्णयाचा फटका बसला. पण, मयांकनं श्रेयस अय्यर आणि वृद्धीमान साहा यांच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या होत्या.

सलामीवीर शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांनी दमदार सुरुवात केली. पण संघाच्या ८० धावा झाल्या असताना शुभमन ४४ धावा करुन बाद झाला. एजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरनं त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही एजाजनं त्रिफळाचीत केलं.

ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही एजाजनं पायचीत करत ८० धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ टिकल्यानंचर श्रेयसही एजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. अशारितीनं तब्बल ४ तेही महत्त्वाचे फलंदाज एजाजनं बाद केले

भारत विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून आक्रमक गोलंदाजी करणारा एजाज पटेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय. तसेच भारतीय फलंदाजांची घसरगुंडी पाहता नेटकऱ्यांनी आता प्रशिक्षक राहुल द्रविडला फलंदाजीला येण्याचा सल्ला दिलाय. तर, काहीजणांकडून अनिल कुंबळे आणि एजाज पटेल यांची तुलना केली जात आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा