Advertisement

ओव्हल मैदान १५ दिवसांसाठी बंद

कुलाबा ए विभागातील प्रसिध्द ओव्हल मैदानावर रोज खेळाडूंची गर्दी असते. मात्र कोरोनाचा फैलाव होत असल्याने येथे होणारी गर्दी टाळणं आवश्यक आहे.

ओव्हल मैदान १५ दिवसांसाठी बंद
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच चालली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ओव्हल मैदान शुक्रवारपासून १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.   त्यामुळे रोज क्रिकेट व इतर खेळांसाठी गजबजणारं हे मैदान बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

कुलाबा ए विभागातील प्रसिध्द ओव्हल मैदानावर रोज खेळाडूंची गर्दी असते. मात्र कोरोनाचा फैलाव होत असल्याने येथे होणारी गर्दी टाळणं आवश्यक आहे. खेळाचे मैदान असल्याने कोरोनाचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी हे मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. मैदाने व सार्वजनिक जागांबाबत त्या ठिकाणचे सहायक आयुक्त परिस्थिती बघून निर्णय घेतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

याबाबतच्या सर्व सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन इतर मैदाने व सार्वजनिक जागांच्या ठिकाणाची पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असंही काकाणी यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा