Advertisement

महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत अापटेंची निवड


महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत अापटेंची निवड
SHARES

केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांनुसार पदाधिकाऱ्यांची वयोमर्यादा निश्चित केल्यानंतर व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर यांनी महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी बोलावण्यात अालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे प्रशांत अापटे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात अाली.


महाराष्ट्राचा दबदबा

महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने गेल्या चार वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धा, जागतिक स्पर्धा तसंच अनेक देशपातळीवरच्या स्पर्धांचं भव्यदिव्य आयोजन करून आपली ताकद अवघ्या देशाला दाखवून दिली. इतकंच नव्हे तर येत्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारीही राज्याने पेलली आहे. शरीरसौष्ठवपटूंच्या भल्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय संघटनेने घेतले असून गेल्या चार वर्षात बक्षिसापोटी पाच कोटींची उधळण केली आहे.


आपल्या राज्याला शरीरसौष्ठवाची शान बनविणार आहोत. शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक सहकार्य करण्यासाठी एक निधी उभारण्याचा आपला मानस अाहे. आपल्या कार्यकाळात संघटनाच नव्हे तर राज्याचे खेळाडूही आर्थिक आणि शारिरीकदृष्ट्या श्रीमंत व्हावेत, हेच आपले प्रमुख ध्येय अाहे.
- प्रशांत आपटे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष


यांचीही निवड

अॅड. विक्रम रोठे यांच्याकडे सरचिटणीसपदाची सूत्रे सोपवण्यात अाली असून हेमचंद्र (पप्पी) पाटील यांची कार्यकारी उपाध्यक्षापदी तर मदन कडू यांची कार्यकारी संचालकपदी निवड झाली अाहे. प्रशांत आपटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची संघटना आणखी बलशाली होईल, असा विश्वास मधुकरराव तळवलकरांनी व्यक्त केला.


हेही वाचा -

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!

मुंबईकर अजिंक्य रहाणेचं भारतीय संघात कमबॅक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा