Advertisement

पीएसपीबी संघाची एअर इंडियावर 3-2 ने मात


पीएसपीबी संघाची एअर इंडियावर 3-2 ने मात
SHARES

सेंट्रल झोन इंटर स्टेट बॅडमिंटन टुर्नामेंट स्पर्धा गुरुवारी पेट्रोलीयम स्पोर्टस् प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) विरुद्ध एअर इंडिया स्पोर्टस् प्रोशन बोर्ड (एआयएसपीबी) यांच्यात झाली.

या लढतीत पीएसपीबी संघाने एयर इंडियाला 3-2 अशा फरकाने मात देत विजय मिळवला. ही स्पर्धा ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे रंगली होती. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पुरुष एकेरी गटात एअर इंडियाच्या मिथुन मंजुनाथने सौरब वर्माला 21-18, 11-21, 21-7 अशा फरकाने मात देत विजय मिळवला.

महिला एकेरी गटात पीएसपीबीच्या रितुपर्णा दासने एअर इंडिया संघाची खेळाडू शिका गौतमला 16-21, 8-21 अशा फरकाने मात देत विजय मिळवला.

पुरुषांच्या दुहेरी फेरीत पीएसपीबीच्या एच. एस. प्रणॉय आणि प्रणव चोप्रा यांनी एअर इंडियाच्या ध्रुव कपिला, सन्याम शुक्ला यांना 21-15, 21-17 इतक्या गुणसंख्येच्या फकराने सामना जिंकला. पण महिला दुहेरी गटात एअर इंडियाच्या प्राजक्ता सावंत आणि संयोगीता घोरपडे या दोघींनी पीएसपीबीच्या अपर्णा बालन, रितुपर्णा दास यांना 21-15, 21-10 अशा फकरकाने नमवत विजय मिळवला.

मित्र दुहेरी फेरीत पीएसपीबी संघाच्या अपर्णा बालन, प्रणव चोप्रा यांनी आपल्या विजयाचा झेंडा रोवला. त्यांनी एअर इंडियाच्या प्राजक्ता सावंत आणि सन्यांम शुक्ला यांना 23-21, 21-19 अशा फरकाने नमवले.


हेही वाचा - 

बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा पराभव

मुंबईत रंगणार बॅडमिंटन फिव्हर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा