बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा पराभव

  Mumbai
  बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा पराभव
  मुंबई  -  

  जयेश धुरी फाऊंडेशनतर्फे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या तारा शहा आणि वरुण कपूरने बाजी मारली. ही स्पर्धा मुलुंडच्या कालिदास स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे खेळवण्यात आली. तारा शहाने 13 वर्षाखालील मुलींच्या गटात एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही स्पर्धांत विजय मिळवला तर, मुलांच्या 15 वर्षांखाली मुलांच्या गटात वरुणने देखील एकेरी आणि दुहेरीमध्ये आपली दमदार कामगिरी दाखवत विजय मिळवला.

  13 वर्षांखालील मुलींच्या गटात एकेरीच्या अंतिम लढतीत ताराने मुंबई उपनगरच्या मान्या अवलानीला 21-12, 21-18 असे हरवले. तसेच, दुहेरीमध्ये अशिता सिंगसोबत मान्या अवलानी आणि निकिता जोसेफने 14-21, 21-13, 21-16 अशा फरकाने मुलींच्या अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावले.

  पुण्याच्या रायन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी वरुण कपूरने मुंबई उपनगरातील सार्थक रोकडेचा 21-14, 21-19 असा पराभव करून विजय साकारला. त्यानंतर त्याने मुंबई उपनगरातील तनीष्क सक्सेना याला हरवून 15 वर्षांखालील दुहेरी गटात विजय मिळवत वरुण आणि तनिष्कच्या जोडीने अंतिम फेरीत अथर्व अरास आणि प्रतिक धर्माधिकारीचा 21-17, 22-20 असा पराभव केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.