कॅरम स्पर्धेत रमेश चौहान विजयी

  Mazagaon
  कॅरम स्पर्धेत रमेश चौहान विजयी
  मुंबई  -  

  भायखळा - ज्येष्ठ शिक्षिका स्व.सुरेखा कडवे स्मृती चषक कॅरम स्पर्धेत रमेश चौहान यांनी विजय मिळवला. तर उदय हळदणकर यांना उपविजेतेपद मिळाले. रमेश चौहान यांनी उदय हळदणकरचे आव्हान २५-१९, २५-२४ अशी मात करुन संपुष्टात आणले आणि कॅरम स्पर्धा जिंकली. तर उपविजेते उदय हळदणकर यांना स्व. मालिनी करंगुटकर स्मृती चषकावर समाधान मानावे लागले. सर.जे.जे.हॉस्पिटल परिसर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि आयडियल स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भायखळ्यातील दैवत रंगमंचावर झालेल्या कॅरम स्पर्धेत रमेश चौहान विरुद्ध उदय हळदणकर यांच्यातील अंतिम सामना चुरशीचा ठरला. उदय हळदणकरने पहिल्या बोर्डमध्ये ८ गुण मिळवले. मात्र रमेश चौहानने त्यानंतर सावध खेळ खेळून पहिला गेम सावरला आणि २५-१६ जिंकत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये दोघांनीही तोडीस तोड खेळ खेळला. अखेर रमेश चौहानने २५-२४ अशी बाजी मारली आणि अजिंक्यपद मिळवले.

  स्पर्धेमध्ये उपांत्य उपविजेते भरत वालावलकर आणि विपुल नाईक आणि उपांत्यपूर्व उपविजेते प्रसाद राणे, धीरज सोळंकी, सुनील वाघेला, सनी बाणे ठरले. बक्षीस सोहळा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी निवृत्ती देसाई, नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे, आयडियल स्पोर्ट्स अकादमीटे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.