चेंबूरमध्ये पोलिसांची क्रिकेट स्पर्धा

 Govandi
चेंबूरमध्ये पोलिसांची क्रिकेट स्पर्धा
चेंबूरमध्ये पोलिसांची क्रिकेट स्पर्धा
See all

चेंबूर -  शिवाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात मुंबई पोलीस परिमंडळ सहा आणि मोहल्ला कमिटी मुव्हमेंट ट्रस्टच्या वतीने 'क्रिकेट फॉर पीस'  स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये परिमंडळ सहा अंतर्गत असलेल्या दहा पोलीस ठाण्यांपैकी आठ संघांनी सहभाग घेतला होता. कुर्ला नेहरूनगर आणि ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.

या स्पर्धेत प्रत्येकी चार ओव्हर्सचे सामने खेळवण्यात आले. शिवाजीनगर आणि आर.सी. एफ पोलीस ठाणे यांच्यात अंतिम सामना झाला. आर. सी. एफ पोलीस ठाण्याच्या संघाने अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अखेरच्या षटकात चार धावांनी सामना जिंकला. विजेता संघ गुरुवारी मरोळ येथे होणाऱ्या पुढील फेरीत दाखल होईल.

Loading Comments