Advertisement

मुंबईकर बुद्धिबळपटू ऋषभची श्रीलंकेत दमदार कामगिरी


मुंबईकर बुद्धिबळपटू ऋषभची श्रीलंकेत दमदार कामगिरी
SHARES

दुसऱ्या वेस्टर्न एशिया यूथ चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या 14 वर्षांच्या ऋषभ शाहने अंडर-14 आणि ब्लिट्ज फॉरमॅट या प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे. ही स्पर्धा श्रीलंका येथील वास्कादुवा शहरातील सीट्रस हॉटेलमध्ये पार पडली. या टुर्नामेंटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला साऊथ मुंबई चेस अकॅडमीचा ऋषभ हा एकमेव स्टार खेळाडू होता.सुरुवातीच्या पहिल्या फेरीत अल्वाला ए. डी. हंसजा रामीथ विरुद्ध झालेल्या लढतीत ऋषभने विजय मिळवला. त्यानंतरचा सामना अव्वल क्रमांकवर असलेल्या बांग्लादेशच्या मोहम्मद फहाद रेहमान याच्यासोबत झाला. या सामन्यात ऋषभची सुवर्ण पदक मिळवण्याची संधी हुकली. 

फहादच्या खेळासमोर ऋषभला आपले वर्चस्व टिकवता आले नाही आणि यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. बिल्ट्ज फॉरमॅटमध्ये देखील ऋषभने चांगली कमगिरी करत 4.5 अशी गुण संख्या मिळवत या प्रकारातही त्याने कांस्य पदक पटकावले.


मी माझ्या देशाचे प्रतिनिधीत्व करत होतो आणि देशासाठी पदक जिंकले आहे. माझ्या आईचे खूप आभार मानतो कारण तिने माझ्यासाठी खूप वेळ दिला आहे. मी एसएमसीए आणि माझ्या प्रशिक्षकाचे देखील आभार मानतो त्यांनी केलेल्या मदतीमुळे आज जागतिक चेस स्पर्धेत खेळू शकलो. जागतिक चेस चॅम्पियनशिपचा टायटल जिंकण्याच्ये माझे ध्येय आहे.
- ऋषभ शाह, चेस खेळाडू


या स्पर्धेत 6.5 गुण मिळवत श्रीलंकेचा मास्टर जी. एम. एच. थिलाकरथ हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. रौप्य पदकाचा मानकरी बांग्लादेशचा मोहम्मद फहाद रेहमान हा ठरला, त्याने 5.5 गुण मिळवले.हेही वाचा -

चेस बॉक्सिंगमध्ये घाटकोपरच्या माधवीला सुवर्णपदकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा