Advertisement

चेस बॉक्सिंगमध्ये घाटकोपरच्या माधवीला सुवर्णपदक


चेस बॉक्सिंगमध्ये घाटकोपरच्या माधवीला सुवर्णपदक
SHARES

घाटकोपरच्या माधवी गोणबरे हिने घरची परिस्थिती बेताची असूनही चेस बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. कोलकाता येथे 12 ते 14 एप्रिल दरम्यान जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 48 वजनी गटात तिने सुवर्ण पदकाची कमाई केली. 

पश्चिम बंगालच्या रजनीला तिने चेकमेट करत सामना खिशात घातला. माधवी सध्या झुनझुनवाला महाविद्यालयात बीएमएमच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे घरची परिस्थिती बेताची असतानाही ती शिक्षणासोबत खेळातही उत्कृष्ट कामगिरी करत अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा