सचिन घरोटे ठरला 'स्वातंत्र्यवीर दौड २०१९'चा विजेता


SHARE

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सैन्यदलातील शूरवीरांना अभिवादन करणारी ‘स्वातंत्र्यवीर दौड २०१९’ आयोजित करण्यात आली होती. सचिन घरोटे ठरला स्वातंत्र्यवीर दौडचा पहिला विजेता तर इथोपियाच्या मिकियास यमाथाची विशेष कामगिरी उल्लेखनीय ठरली. टिम व्हीजन स्वयंसेवी संस्थेचे नेत्रहीन आणि दिव्यांगांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, सातारा,  पालघर, औरंगाबाद  तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील सहस्त्रावधी  स्पर्धक आवर्जून आले होते. 


१६ ते ८० या वयोगटासाठी

'स्वातंत्र्यवीर दौड २०१९' या स्पर्धेचं रविवारी सकाळी ५.०० वाजता या स्पर्धेचं स्वातंत्र्यवीर दादरमधील शिवाजी पार्क येथील सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजन करण्यात आल होतं. स्वातंत्र्यवीर दौड ही १६ ते ८० या वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २ हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. तसच, स्पर्धेतील विजेत्यांना २.५ लाख रुपयांची विविध गटात एकूण ६४ पारितोषिके दिली गेली.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, विकास सबनीस, मिलिंद सोमण यांच्या मातोश्री  उषा सोमण,सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पारटकर, नगरसेवक अरविंद  भोसले, स्वप्नील सावरकर, अभिनेते श्रीरंग देशमुख,निवेदिका मालविका मराठे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर तसेच गुरुरचरणसिंग सिद्धू यांनी संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

'स्वातंत्र्यवीर दौड २०१९' या स्पर्धेचं रविवारी सकाळी ५.०० वाजता या स्पर्धेचं स्वातंत्र्यवीर दादरमधील शिवाजी पार्क येथील सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजन करण्यात आल होतं. स्वातंत्र्यवीर दौड ही १६ ते ८० या वयोगटासाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २ हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रशस्तीपत्रक देण्यात आलं.


५ आणि १० कि.मी.साठी दौड

'स्वातंत्र्यवीर दौड' ही ५ कि.मी. आणि १० कि.मी.साठी आहे. ५ कि.मी. दौडसाठी वयोगट १६ ते २५ वर्षे, २६ ते ३५ वर्षे, ३६ ते ४५ वर्षे, ४६ ते ५५ वर्षे आणि ५६ वर्षांवरील व्यक्ती सहभाग घेतला होता. तसंच, १० कि.मी. दौडसाठी वयोगट १८ ते २७ वर्षे, २८ ते ३७ वर्षे, ३८ ते ४७ वर्षे, ४८ ते ५७ वर्षे आणि ५८ वर्षांवरील व्यक्तींचा समावेश होता.


सैन्यदलातील कुटुंबीयांना मदत

गेली अनेक वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी सैन्यदलातील वीरांना शौर्य पुरस्कार दिला जातो. सैन्यदलातील शूरवीरांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यवीर दौडमधून होणाऱ्या निधी संकलनातून मदत केली जाणार आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांच्या राष्ट्रकार्याला अभिवादन करणारी ही दौड आहे. या दौडच्या माध्यमातून समाजातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रभावी करण्याचा उद्देश आहे. तसंच, स्वातंत्र्यवीर दौडद्वारे भारतीय जवानांचं शौर्य आणि कामगिरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न असून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल असल्याचं कार्यक्रम प्रमुख विज्ञानेश मासावकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या