Advertisement

भालेकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत सप्तर्षी रॉय विजयी


भालेकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत सप्तर्षी रॉय विजयी
SHARES

आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडेमीने आयोजित केलेल्या शालिनीताई भालेकर स्मृती चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सर्व साखळी सामने जिंकून इंटरनॅशनल मास्टर सप्तर्षी रॉयने प्रथम क्रमांक पटकाविला.

सप्तर्षीने प्रमुख प्रतिस्पर्धी गुजरातचा इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमाला मात देत अंजिक्यपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेमध्ये गुजरात, बंगाल आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित 82 बुद्धिबळपटूंसह एकूण 109 खेळाडू सहभागी झाले होते.

पारितोषिक वितरण समारंभ क्रीडाप्रेमी अनंत भालेकर, पपी पाटील व संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ही स्पर्धा डॉ. डीसिल्वा हॉल, दादर येथे खेळवण्यात आली होती.


हे आहेत मानकरी 

शालिनीताई भालेकर स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेमधील सर्व साखळी सामने जिंकून इंटरनॅशनल मास्टर सप्तर्षी रॉयने सर्वाधिक ७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर मुंबईच्या अमरदीप बारटक्केने (6 गुण) द्वितीय, मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयाचा आशुतोष गांगणने (6 गुण) तृतीय, इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमाने (6 गुण) चौथा, स्वप्नील कोठारीने (6 गुण) पाचवा, पराग तेरवाडकरने (5.5 गुण) सहावा, केतन बोरीचाने (5.5 गुण) सातवा, विश्वेश कोचरेकरने (5.5 गुण) आठवा, साईराज चित्तलने (5.5 गुण) नववा, गजानन जयदेने (5.5 गुण) दहावा क्रमांक पटकावला. एकूण 40 बुद्धिबळपटू पुरस्काराचे मानकरी ठरले.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा