परळ - हिवाळा सुरू झाला की, प्रत्येक शाळेत मैदानी खेळदेखील सुरू होतात. यामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा खेळांचा समावेश असतो. मात्र सध्याच्या संगणकीय युगात शारीरिक व्यायामाचीही गरज असल्यानं परळ पूर्व येथील आर. एम. भट्ट शाळेच्या मैदानात अशाच प्रकारचे खेळ सुरू आहेत. स्पर्धा म्हणून नव्हे, तर शिक्षणाबरोबर चांगल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून मैदानी खेळ महत्त्वाचे असल्यानं याला प्रधान्य देण्यात येतंय, असं शिक्षक विजय पाटील यांनी सांगितलं.