पिता की सैतान?

 Tagore Nagar
पिता की सैतान?

विक्रोळी - अल्पवयीन मुलीवर पित्यानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विक्रोळीतल्या पार्कसाईट पोलीस ठाणे परिसरात राहणारी ही मुलगी आई-वडिलांसोबत गावी गेली होती. त्यावेळी शेतात फेरफटका मारताना नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे मुलगी घाबरली. मुलीच्या याच भीतीचा फायदा उचलत विकृत पित्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. मात्र वडिलांच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने अखेर ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर रविवारी मुलीच्या आईने नराधम पतीविरोधात विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून आरोपी पित्याला पॉक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

Loading Comments