शौर्य आणि मानवचा उपांत्य फेरीत प्रवेश

  Borivali
  शौर्य आणि मानवचा उपांत्य फेरीत प्रवेश
  मुंबई  -  

  टेबल टनिस स्पर्धेत राज्यातील आघाडीचा खेळाडू असलेल्या शौर्य पेडणेकरने प्रतिस्पर्धी सोहम राणे याला 11-6,11-4,11-8,8-11,11-6 अशा फरकाने मात देत विजय मिळवला आणि मुलांच्या एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना अत्यंत रंगतदार ठरला. मंडपेश्वर सिव्हिल फेडरेशनने आयोजित केलेली मुंबई फोर स्टार रँकिंग टेबल टेनिस टुर्नामेंट ही स्पर्धा गुरुवारी बोरिवली येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये झाली.

  या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मानव मेहताने प्रतिस्पर्धी अश्विन सुब्रमण्यमला 10-12,15-13, 11-5, 10-12,11-8,6-11,11-6 अशा फरकाने मात देत विजय मिळवला. तर तिसऱ्या मानांकित जिग्नेश रहातवालने प्रतिस्पर्धी असलेला तन्मय राणेला 6-11, 11-5, 11-4,11-7, 7-11, 11-4 अशा गुणसंख्येने चांगलीच धूळ चारत विजयाचा डोलारा साकारला.

  पुरुषांच्या एकेरी गटातील 32 व्या फेरीत अक्षय गोगरी हा सुरुवातीला 1-2 अशा फरकाने पिछाडीवर होता. पण नंतर अक्षयने प्रतिस्पर्धी असलेल्या दिजंग कामसन याला 7-11, 11-9, 7-11, 11-8, 11-7 अशा गुण संख्येने पराभव केला. आणखी एक प्रभावी डावखुरा खेळाडू ओम लोटीकरने प्रतिस्पर्धी रजत पटेल याला 11-8, 11-6, 11-7 अशा फरकाने पराभव करत विजय मिळवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.