Advertisement

'डब्ल्यूडब्ल्यूई' सुपरस्टार्सचा ऑलिम्पियन खेळाडूंशी 'विशेष' संवाद


'डब्ल्यूडब्ल्यूई' सुपरस्टार्सचा ऑलिम्पियन खेळाडूंशी 'विशेष' संवाद
SHARES

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रियात दिव्यांग खेळाडूंची 'स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर 2017' ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मुलांसह एकूण 8 स्पर्धक आणि त्यांच्या प्रशिक्षकांची बुधवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात 'डब्ल्यूडब्ल्यूई' सुपरस्टार 'बिग ई' आणि 'कोफी किंगस्टन' यांनी भेट घेतली. यावेळी स्पेशल ऑलिम्पिकचे महाराष्ट्रातील पदाधिकारी देखील उपस्थित होते.

या भेटीत पदक विजेत्या खेळाडूंनी अॅथलेटीक्स स्पर्धेतील आपला अनुभव 'डब्ल्यूडब्ल्यूई' सुपरस्टार्ससोबत शेअर केला. ऑस्ट्रियातील स्पर्धेत फ्लोअर हॉकी, फ्लोअर बॉल आणि युनिफाइड फ्लोअर बॉल या तिन्ही क्रीडा प्रकारात भारतीय संघांनी एकाच दिवसात सुवर्णपदकाची कमाई केली.

'स्पेशल ऑलिम्पिक' आणि 'डब्ल्यूडब्ल्यूई' यांनी 2016 साली क्रीडा माध्यमातून बदल घडवण्यासाठी भागीदारी करण्याची घाेषणा केली होती. या भागीदारीद्वारे 'डब्ल्यूडब्ल्यूई' विशेष ऑलिम्पिक खेळांच्या मोहिमेला समर्थन देत, बौद्धिक अपंगत्व असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळाच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणते.

'स्पेशल ऑलिम्पिक, भारत' या संघटनेचा एक भाग असलेली 'स्पेशल ऑलिम्पिक, महाराष्ट्र' ही संघटना राज्यात काम करते. महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यातील एकूण 60 हजार स्पेशल अॅथलिट्सना खेळाचे प्रशिक्षण देणे आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे याचे काम ही संघटना करते. दिव्यांग मुलांना क्रीडा क्षेत्रात पुढे आणण्याच्या दृष्टीने ही संघटना महत्वाचे काम करत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा