Advertisement

बाॅम्बे जिमखान्यात स्क्वाॅश महोत्सव रंगणार


बाॅम्बे जिमखान्यात स्क्वाॅश महोत्सव रंगणार
SHARES

मुंबईतील सर्वात जुन्या बाॅम्बे जिमखान्यावर या महिन्यात स्क्वाॅश महोत्सव रंगणार अाहे. स्क्वाॅश स्पर्धांसाठी मेजवानी असलेल्या बाॅम्बे जिमखान्याच्या अांतरराष्ट्रीय दर्जाच्या कोर्टवर ६ अाॅगस्ट ते १५ अाॅगस्टदरम्यान दोन स्पर्धांची मेजवानी चाहत्यांना लुटता येणार अाहे. ४३वी महाराष्ट्र राज्य पुरुषांची स्क्वाॅश स्पर्धा तसेच तिसरी इंडियन क्लासिक ज्युनियर अोपन स्क्वाॅश स्पर्धा बाॅम्बे जिमखान्यावर अायोजित करण्यात अाली अाहे. सध्या भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू महेश माणगावकरला अव्वल मानांकन देण्यात अाले अाहे.


सव्वा पाच लाखांची बक्षिसं

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्क्वाॅश स्पर्धेत विजेत्यांना सव्वा पाच लाख रुपयांची बक्षिसं दिली जाणार अाहेत. पुरुष गटातील विजेता १ लाख ३० हजारांचा तर उपविजेता ७५ हजार रुपयांचा मानकरी ठरेल. ही स्पर्धा पुरुष खुली, पुरुष ३५ वर्षांवरील, पुरुष ४५ वर्षांवरील, पुरुष ५५ वर्षांवरील अाणि व्यावसायिक अशा पाच गटांत खेळविण्यात येईल. मुंबईच्या महेश माणगावकरला प्रथम तर मुंबईच्याच अभिषेक प्रधानला दुसरे मानांकन देण्यात अाले अाहे. ही स्पर्धा ६ ते ९ अाॅगस्टदरम्यान होईल.


५०० स्पर्धकांचा सहभाग

इंडियन ज्युनियर अोपन स्क्वाॅश स्पर्धेत ५००पेक्षा जास्त स्पर्धकांनी अापला सहभाग नोंदवला अाहे. इंडियन क्लासिक ज्युनियर ही अांतरराष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर गटातील सर्वात मोठी स्पर्धा अाहे. या स्पर्धेत तब्बल ५१३ खेळाडू अापले नशीब अाजमावणार अाहेत. एसअारएफअायच्या संकेतस्थळावर पहिल्यांदाच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार अाहे. या स्पर्धेत विजेत्यांना ७ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार असून मुले अाणि मुलींच्या गटातील विजेत्यांना समान बक्षिसे दिली जातील. ही स्पर्धा ११ ते १५ अाॅगस्टदरम्यान रंगणार अाहे.


हेही वाचा -

टाटा मुंबई मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात

सर्फराझ खानला करायचीय मुंबई संघात घरवापसी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा