Advertisement

सेंट एलियस, डॉन बॉस्कोला एमएचएएल हॉकी स्पर्धेचं विजेतेपद


सेंट एलियस, डॉन बॉस्कोला एमएचएएल हॉकी स्पर्धेचं विजेतेपद
SHARES

महाराष्ट्र हॉकी असोसिएशन लिमिटेडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय हॉकी स्पर्धेत (16 वर्षांखालील मुले व मुली) खारच्या सेंट एलियस हायस्कूल आणि माटुंगाच्या डॉन बॉस्को शाळेनं अनुक्रमे मुली आणि मुलींच्या गटात जेतेपदाला गवसणी घातली. विजेत्या संघांना चषक अाणि प्रत्येकी 10 हजार रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात अालं.


सेंट एलियसचं निर्विवाद वर्चस्व

चर्चगेट येथील महिंद्रा हॉकी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सेंट एलियसनं वांद्रे येथील डुरेलो कॉन्व्हेंट हायस्कूलवर निर्विवाद वर्चस्व गाजवित 4-0 असा विजय मिळवला आणि जेतेपद पटकावलं. सेंट एलियसकडून मुली श्रद्धा हळदणकर, आकांक्षा डाफळे, प्रियांका म्हात्रे आणि आराधना जाधव यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाची कामगिरी बजावली.


फैझुद्दीनचे दोन गोल डॉन बॉस्कोच्या विजयात निर्णायक

मुलांच्या अंतिम सामन्यात, फैझुद्दीन सिद्दीकी यानं दोन गोल केल्यामुळं डॉन बॉस्कोला वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस संघावर २-० असा सहज विजय मिळवता आला. 44व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर फैझुद्दीननं गोल झळकावला. त्यानंतर चार मिनिटांनी सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करत  फैझुद्दीननं दुसरा गोल लगावून डॉन बॉस्कोच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा