Advertisement

मुंबई खंडाळा सायकल शर्यतीत सुदर्शन, विवेक ठरले विजेते


मुंबई खंडाळा सायकल शर्यतीत सुदर्शन, विवेक ठरले विजेते
SHARES

माजी राष्ट्रीय विजेते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक खळे जायंट स्टारकेन मुंबई ते खंडाळा या ९० किलोमीटर अतंराच्या सायकल शर्यतीत एलिट गटात पुण्याच्या सुदर्शन देवर्डेकरने बाजी मारली. एमटीबी हायब्रीड गटात जुन्नरच्या विवेक वायकरने वर्चस्व गाजवले. मकरंद माने हा या शर्यतीतील शेडुंग या एकमेव प्राईमचा विजेता ठरला.


खोपोलीनंतर वाढली चुरस

खार इथून सुरू झालेल्या या शर्यतीचा चुनाभट्टीपर्यंतचा मार्ग न्यूट्रल झोन होता. त्यानंतर मात्र शर्यतीत चांगली चुरस पहायला मिळाली. सकाळी लवकर शर्यत सुरू झाल्यामुळे थंड हवामानाचा फायदा उठवत खोपोलीपर्यंत सर्व सायकलपटू एकत्रच होते. त्यामुळे स्पर्धेतील एकमेव प्राइम जिंकण्यासाठी सायकलपटूंनी जोरदार प्रयत्न केले. त्यात मकरंद मानेने १ तास १३ मिनिटे ०७ सेकंद अशी वेळ नोंदवत शेडुंग प्राईमचे पारितोषिक जिंकले.


भोर घाटाचे अाव्हान सुदर्शनने पेलले

सायकलपटूंसाठी नेहमीच आवहनात्मक ठरलेल्या भोर घाटाने यावेळीही सायकलपटूंची परीक्षा पाहिली. पण घाटाचे आव्हान सहज पेलवताना सुदर्शनने २ तास १७ मिनिटे ०५ सेकंद अशा वेळेत ९० किलोमीटरचे अंतर पार करत पहिले स्थान मिळवले. सुदर्शनपाठोपाठ विवेकने २ तास २४ मिनिटामध्ये हे अंतर पूर्ण करत एमटीबी गटाचे विजेतेपद मिळवले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा