Advertisement

अाशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवकडे भारताचे नेतृत्व


अाशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवकडे भारताचे नेतृत्व
SHARES

मिस्टर इंडिया किताबाला गवसणी घालणारा मुंबईकर बाॅडीबिल्डर सुनीत जाधव अाणि उत्तर प्रदेशचा यतिंदर सिंग यांच्यावर पुणे येथे २ ते ८ अाॅक्टोबर २०१८ दरम्यान रंगणाऱ्या ५२व्या अाशियाई बाॅडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची भिस्त असणार अाहे. सुनीत जाधव, यतिंदर सिंग, बाॅबी सिंग यांचा अाशियातल्या दिग्गज शरीरसौष्ठवपटूंसमोर कस लागणार अाहे. इंडियन बाॅडीबिल्डर्स फेडरेशन (अायबीबीएफ) तर्फे अाशियाई बाॅडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट फेडरेशनच्या (एबीबीएफ) मान्यतेने ही स्पर्धा पुणे येथील बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार अाहे. तब्बल सात दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत विविध गटांत एकूण ५१ प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार अाहे.


या खेळाडूंवरही भिस्त

सागर कातुर्डे (महाराष्ट्र), भास्करन (रेल्वे), जयप्रकाश (रेल्वे) या भारतीय बाॅडीबिल्डर्सवरही भिस्त असणार अाहे. त्याचबरोबर महिलांमध्ये सरिता देवी (मणिपूर), ममता देवी (दिल्ली), संजना दलाल (उत्तर प्रदेश), अंकिता सिंग (कर्नाटक) या महिला खेळाडूंकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा अाहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची निशरीन पारीख ही ५२ वर्षांची बाॅडीबिल्डर भारताचे प्रतिनिधीत्व करणार अाहे.


बाॅडीबिल्डिंग हा भारतात झपाट्याने वाढत असलेला खेळ अाहे. अाशियाई बाॅडीबिल्डिंग चॅम्पियनशिपचे अायोजन भारतात करणे, ही बाॅडीबिल्डिंगसाठी मोठी बाब मानावी लागेल. लोकांमध्ये हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी यांसारखे प्रयत्न करणे अामच्यासाठी फायदेशीर ठरणार अाहे.
- चेतन पाठारे, महासचिव, अायबीबीएफ


हेही वाचा -

मुंबईत वाढताहेत महिला बाॅडीबिल्डर्स- सुनीत जाधव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा