हॉकी सामना रंगला बरोबरीत

  Churchgate
  हॉकी सामना रंगला बरोबरीत
  मुंबई  -  

  चर्चगेट - चर्चगेटच्या महिंद्रा स्टेडिअममध्ये पार पडलेल्या लीग स्पर्धेत सुपर डिविजन गटातील बॉम्बे रिपब्लिकन्स आणि सेंट्रल सेक्रेट्रीअट यांच्यातील सामना 3-3 बरोबरीत संपला. मुंबई हॉकी लीग असोसिएशन लिमिटेडनं या लीग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सेंट्रल सेक्रेट्रीअट संघाच्या थिमन्नाने सामन्याच्या 14 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बॉम्बे रिपब्लिकन्स संघाच्या विक्रम यादवनं 20 व्या मिनिटाला गोल करत 1-1 असा सामना बरोबर केला. सामन्याच्या 39 व्या मिनिटाला थिमन्नाने दुसरा गोल करत संघाला 2-1 अशी पकड केली.

  दुसऱ्या सत्रात बॉम्बे रिपब्लिकन्सच्या कार्तिक शर्माने 53 व्या मिनिटाला आणि गनेंद्रजितने गोल करत 60 व्या मिनिटाला गोल करत सामना 3-2 असा खेळत आघाडी मिळवली. सेंट्रल सेक्रेट्रीअटकडून थिमन्नाने 66 व्या मिनिटाला गोल करत लढत 3-3 अशी बरोबरीत नेली. शेवटी दोन्ही संघाना गोल न झळकवता आल्यानं सामना बरोबरीत संपला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.