Advertisement

चैतन्य शाह, यश फडते फायनलमध्ये भिडणार


चैतन्य शाह, यश फडते फायनलमध्ये भिडणार
SHARES

मुंबईचा चैतन्य शाह अाणि गोव्याचा यश फडते या बिगरमानांकित खेळाडूंमध्ये इंडियन क्लासिक ज्युनियर अोपन स्क्वाॅश स्पर्धेची अंतिम लढत रंगणार अाहे. बाॅम्बे जिमखान्यावर झालेल्या या स्क्वाॅश महोत्सवात चैतन्य शाहने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित अाणि भारताचा अग्रमानांकित खेळाडू तुषार शहानी याला उपांत्य फेरीत ११-६, ४-११, १४-१२, ११-६ असा पराभवाचा धक्का दिला अाणि अंतिम फेरीत स्थान मिळवले.


सुरुवातीपासूनच वर्चस्व

या स्पर्धेत अंडरडाॅग म्हणून समजला जाणाऱ्या चैतन्यने एकापेक्षा सरस कामगिरीचे प्रदर्शन करत अव्वल मानांकित तुषारला चार गेममध्ये पराभूत केले. अाक्रमक खेळ करत चैतन्यने अात्मविश्वासाने सुरुवात केली अाणि पहिला गेम ११-६ असा जिंकला. तुषारने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत जशास तसे उत्तर दिले. मात्र तिसऱ्या अाणि चौथ्या गेममध्ये अापल्या कामगिरीची चुणूक दाखवत चैतन्यने अंतिम फेरीत धडक मारली. “यापूर्वीही मी तुषारविरुद्ध अनेक वेळा अंतिम फेरीत खेळलो होतो. तो सर्वोत्तम प्रतिस्पर्धी असला तरी अाज त्याच्यावर विजय मिळवल्यानंतर अानंद झाला अाहे,” असे चैतन्यने विजयानंतर सांगितले.


यशची अागेकूच

१६ वर्षीय यश फडते यानेही धडाकेबाज कामगिरी करत दुसऱ्या मानांकित राहुल बैठा याच्यावर पाच गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात ८-११, १३-११, ११-४, ९-११, ११-७ असा विजय मिळवला. मुलींच्या १९ वर्षांखालील गटात, बिगरमानांकित सैन्या वत्स हिने नवमी शर्मा हिच्यावर ११-६, ११-६, ११-६ असा सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित अमिता गोंदी हिने बिगरमानांकित जनिया सिंग हिला ११-९, ११-८, ५-११, ८-११, १२-१० असे पराभूत केले.


हेही वाचा -

बाॅम्बे जिमखान्यात स्क्वाॅश महोत्सव रंगणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा