Advertisement

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विघ्नेश, अथिवा, अभिजितचा जलवा


राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विघ्नेश, अथिवा, अभिजितचा जलवा
SHARES

धारावी क्रीडा संकुलात पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत शितो रियू कराटे अँड बाॅक्सिंग असोसिएशनच्या कराटेपटूंनी अापली छाप पाडली. विघ्नेश मुरकर, अथिवा लाड अाणि अभिजित पटेल या शितू रियू कराटे असोसिएशनच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली.महाराष्ट्र हौशी स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव प्रकाश नकाशे यांनी या स्पर्धेचे अायोजन केले होते. या स्पर्धेत जवळपास 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. प्रशिक्षक सेन्सेई उमेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या शितो रियूच्या अालोक ब्रीदने रौप्यपदक तर दक्ष शेट्टी हिने कांस्यपदक पटकावले.

संबंधित विषय
Advertisement