Advertisement

पालिका शाळेतील मुलींची कबड्डी स्पर्धा


पालिका शाळेतील मुलींची कबड्डी स्पर्धा
SHARES

घाटकोपर – एन वॉर्डच्या महानगरपालिका शिक्षण विभागाच्यावतीनं मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पंतनगर मराठी शाळा क्र. 3 च्या मैदानात घेण्यात आली होती. या स्पर्धेत 25 पालिका शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलींनी सहभाग घेतला होता. या कबड्डी स्पर्धेत विक्रोळी पार्क साईटमधील इंग्रजी शाळेच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. यावेळी विजेत्या मुलींना प्रमाणपत्र आणि चषक देण्यात आलं. शिक्षण विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा