सेंट पॉल संघ अंतिम फेरीत

  Dadar
  सेंट पॉल संघ अंतिम फेरीत
  मुंबई  -  

  दादर- एमएसएसए आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मुंलांच्या 16 वर्ष वयोगटात दादरच्या सेंट पॉल हायस्कूल संघाने चौथ्या डिव्हिजनच्या उपांत्य फेरीत दहिसरच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल संघावर 4-1 ने मात करत अंतिमफेरीत प्रवेश मिळवला आहे. मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि मुंबई इंडियन्सच्यावतीने या स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. कुपरेज ग्राउंडवर पार पडलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये सेंट पॉल हायस्कूल संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. रॉड्रिग्जने दोन गोल करत संघाच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका पार पाडली. त्याला प्रफुल्ल सोळंकी आणि हर्षद धुमाळे यांनी प्रत्येकी एक गोल करत चांगली साथ दिली. पराभूत संघाकडून एकमात्र गोल हा ओम वेद यांने झळकवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.