महिला दिनानिमित्त मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू

 wadala
महिला दिनानिमित्त मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू

वडाळा - वडाळा इथल्या शारीरिक शिक्षण मंडळातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. हे प्रशिक्षण केंद्र 8 मार्चपासून नियमित सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत सोमवार ते शनिवारी असणार आहे. तर, गजानन फोंडसे, सुभाष घेरडे, रामचंद्र पाटील, राजू हाके, प्रकाश तानवडे इत्यादी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात लाभणार आहे.

Loading Comments