Advertisement

योगेश धोंगडे, काजल कुमारीला मुंबई जिल्हा कॅरम स्पर्धेचे जेतेपद


योगेश धोंगडे, काजल कुमारीला मुंबई जिल्हा कॅरम स्पर्धेचे जेतेपद
SHARES

दादर येथील शिवाजी पार्कवर रंगलेल्या वरिष्ठ मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेने पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत योगेश धोंगडेने अभिषेक भारतीला २०-११, १८-२५, २५-१० असे तीन सेटमध्ये पराभूत केले. महिलांमध्ये काजल कुमारीने शिल्पा पळणीटकर हिचा पराभव करून जेतेपदावर मोहोर उमटवली.


अभिषेक भारतीची कडवी झुंज

प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत रंगलेल्या या सामन्यात योगेशने अाठव्या बोर्डअखेरीस पहिला सेट जिंकला. पण अभिषेक भारताने कडवी झुंज देऊन २५-१८ अशा फरकानं दुसरा सेट जिंकून सामन्यात रंगत अाणली. मात्र अनुभवाच्या जोरावर योगेशने तिसऱ्या सेटमध्ये पहिले चार बोर्ड जिंकून अाघाडी घेतली. तिसरा सेट २५-१० अशा सहजपणे जिंकून त्याने पुरषांच्या गटात बाजी मारली.


महिलांमध्येही काँटे की टक्कर

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यातही काँटे की टक्कर पाहायला मिळाली. इंडियन अाॅईलच्या काजल कुमारीने पहिला सेट २५-११ असा जिंकला. त्यानंतर भारतीय अायुर्विमा महामंडळाच्या शिल्पा पळणीटकरने २३-१५ असा दुसरा सेट जिंकून सामना चुरशीचा केला. पण काजल कुमारीसमोर शिल्पाचा निभाव लागला नाही. तिसरा सेट २५-५ असा सहज जिंकून काजलने विजेतेपदाला गवसणी घातली. भारतीय अाॅलिम्पिक असोसिएशनचे संयुक्त सचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात अाले.


हेही वाचा -

काजल कुमारीला फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेचं अजिंक्यपद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा