कॅरम विजेत्यांचा सन्मान

Lower Parel
कॅरम विजेत्यांचा सन्मान
कॅरम विजेत्यांचा सन्मान
कॅरम विजेत्यांचा सन्मान
See all
मुंबई  -  

करीरोड - स्पोर्ट सिंडिकेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे प्रथम सिनको चषक महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुरुष एकेरीत पंकज पवार आणि महिला एकेरीत काजल कुमारी यांनी विजेतेपद पटकावलं.

महिला एकेरी अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात अग्रमानांकित इंडियन ऑईलच्या काजल कुमारीनं मैत्रेयी गोगटेचा पराभव केला. काजलनं 9 आणि 6 गुण घेऊन 21-20 असा एक गुणच्या फरकानं विजयीपदाला गवसणी घातली. काजल कुमारीला रोख 15 हजार, सिनको चषक आणि सिनको कॅरम बोर्ड प्रदान करण्यात आला. तर उपविजेता मैत्रेयी गोगटेला रोख 10 हजार, सिनको चषक आणि सिनको कॅरम बोर्ड देण्यात आले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या माजी राज्य विजेता पंकज पवारनं योगेश डोंगडे विरुद्ध आक्रमक खेळी केली. पंकज पवरला अंतिम विजयी म्हणून रोख 25 हजार, सिनको चषक आणि सिनको कॅरम बोर्ड प्रदान करण्यात आला. उपविजेता योगेश डोंगडेला रोख रक्कम 15 हजार, सिनको चषक आणि सिनको कॅरम बोर्ड देण्यात आले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.