घराच्या छतावरुन पडून तरुणाचा मृत्यू


SHARE

विष्णूनगर - चेंबूरच्या विष्णूनगर परिसरात सोमवारी एका तरुणाचा घराच्या छतावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रशांत दरवेशी (२२) असं या मुलाचं नाव असून त्याच्या नातेवाईकांनी तत्काळ त्याला चेंबूरमधील इनलॅक्स रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी उपचाराला उशिर लावल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातला होता. त्यामुळे चेंबूर पोलिसांना रुग्णालयात बंदोबस्त वाढवावा लागला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या